ताजे अपडेट
Trending

आज सांगोल्यात जाहीर सभेने होणार शेकापचा प्रचाराचा समारोप

दुपारी 12 वाजता पदयात्रा, 2 वाजता जाहीर सभा

Spread the love

सांगोला शहर व परिसरातील महाविकास आघाडी-इंडिया अलायन्समधील सर्व मित्रपक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही तालुका चिटणीस दादाशेठ बाबर व अॅड. भारत बनकर यांनी केले आहे.

सांगोला : प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा. पदयात्रेचे आयोजन व तसेच जाहीर सभेचे आयोजन दुपारी २ वा. करण्यात आले असल्याची माहिती शेकापचे शहर चिटणीस व माजी नगरसेवक अॅड. भारत बनकर यांनी दिली. सदरच्या पदयात्रेत डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख हे सहभागी असणार आहेत.

सदरची पदयात्रेची सुरुवात मेन रोड येथील मारूती मंदिर येथून करण्यात येणार आहे. पदयात्रा कुंभार गल्ली, महादेवी गल्ली, डबीर चौक, देशपांडे गल्ली, खडतरे गल्ली, मुजावर गल्ली, बी.एस.एन.एल ऑफीस परिसर, कोष्टी गल्ली, जुना बेले वाड्यासमोरून, मणेरी गल्ली, परीट गल्ली, मठाचा बोळ, मारूती मंदिर परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेची सांगता जाहीर सभेत होणार आहे.

तरी सांगोला शहर व परिसरातील महाविकास आघाडी-इंडिया अलायन्समधील सर्व मित्रपक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही तालुका चिटणीस दादाशेठ बाबर व अॅड. भारत बनकर यांनी केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका