ताजे अपडेट
Trending

घेरडी गटात दीडशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा धडाका

Spread the love

या गावांतील अनेक वर्षांपासूनची प्रलंबित आणि नव्याने अनेक कामे मार्गी लावली आहेत. या विकास कामांमुळे या विविध गावांतील ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यांचे जगणे अधिक सुलभ झाले आहे. मागील अनेक वर्षांच्या इतिहास एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे प्रथमच झाल्याचे दिसत आहे.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
आमदार शहाजीबापू पाटील यांनी घेरडी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये तब्बल १५५ कोटी रुपयांहून अधिक निधीची विकासकामे केली आहेत. घेरडी, आगलावेवाडी, भोपसेवाडी, बुरंगेवाडी, डिकसळ, डोंगरगाव, गळवेवाडी, हंगिरगे, नराळे, पारे, सोनंद, तरंगेवाडी या गावांसह विविध वाड्यावस्त्यावर ही विकास कामे करण्यात आली आहेत.

या गावांतील अनेक वर्षांपासूनची प्रलंबित आणि नव्याने अनेक कामे मार्गी लावली आहेत. या विकास कामांमुळे या विविध गावांतील ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यांचे जगणे अधिक सुलभ झाले आहे. मागील अनेक वर्षांच्या इतिहास एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे प्रथमच झाल्याचे दिसत आहे.

विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या कामांचे स्वरूप खालील प्रमाणे..

घेरडी गावात एकूण ५६ कोटी २० लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली. एकूण कामे : २३, पूर्ण कामे: १५, सुरू कामे : १, निविदा प्रक्रिया : ६, प्रलंबित कामे : १.

डोंगरगाव : एकूण २० कोटी २१ लाख रुपये खर्चून ही कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : २१, पूर्ण कामे : १२, सुरू कामे : १, निविदा प्रक्रिया: ७, प्रलंबित कामे : १.

सोनंद : या गावात एकूण २६ कोटी ९१ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : ४९, पूर्ण कामे : ३८, सुरू कामे : ४, निविदा प्रक्रिया : १, प्रलंबित कामे : ६.

गळवेवाडी: या गावात एकूण २ कोटी ७ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत.

पारे : २ कोटी ३९ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत.

हंगिरगे : या गावात एकूण १० कोटी ९९ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत.

नराळे : या गावात एकूण ६० लाख ५० हजार रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत.

भोपसेवाडी : या गावात एकूण १ कोटी ११ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत.

डिकसळ : या गावात तब्बल ७ कोटी ४१ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण कामे : ११, पूर्ण कामे : १०, निविदा प्रक्रिया : १.

कोणत्या भागात कोणती कामे करण्यात आली त्याची सविस्तर यादी खालील प्रमाणे आहे.
(“पाणीदार आमदार” या कार्य अहवालावर आधारित हा मजकूर आहे. )

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका