थिंक टँक स्पेशल
Trending

सांगोल्यात साकारतेय अमेरिकेच्या व्हाईट हाऊससारखी प्रशासकीय इमारत

Spread the love

सांगोला : विशेष प्रतिनिधी
2019 साली आमदार झाल्यापासून शहाजीबापू पाटील यांनी कामाचा धडाका लावला आहे. मोडकळीस आलेली सांगोला नगर परिषदेची इमारत पाडून त्या जागी भव्य अशी पाच मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे. ही इमारत जणू अमेरिकेतल्या वाईट हाऊस सारखी साकारण्यात येणार आहे.

या नवीन इमारतीचे बांधकाम क्लासिक स्टाईलचे होणार आहे. ही इमारत पाच मजली बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे बांधकाम क्षेत्र 6877.09 स्क्वेअर मीटर एवढे असणार आहे. या इमारतीमध्ये 302 दुचाकी आणि 26 चारचाकी वाहने बसतील एवढे मोठे पार्किंग असणार आहे

शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तसेच आदर्श प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून नागरिकांचा वेळ वाचावा या हेतूने सांगोला नगरपरिषदेची नवीन भव्य आणि आकर्षक प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या इमारतीमध्ये जनरेटर बॅक अप सह दोन लिफ्ट असतील. या इमारतीमध्ये 150 लोक बसतील एवढ्या आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह असेल.

सांगोला नगरपरिषदेच्या या भव्य अशा नवीन इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाने 15 कोटींचा निधी मंजूर केला आहे. याची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.

या नवीन इमारतीची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
या नवीन इमारतीचे बांधकाम क्लासिक स्टाईलचे होणार आहे. ही इमारत पाच मजली बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे बांधकाम क्षेत्र 6877.09 स्क्वेअर मीटर एवढे असणार आहे. या इमारतीमध्ये 302 दुचाकी आणि 26 चारचाकी वाहने बसतील एवढे मोठे पार्किंग असणार आहे.

या इमारतीमध्ये जनरेटर बॅक अप सह दोन लिफ्ट असतील. या इमारतीमध्ये 150 लोक बसतील एवढ्या आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह असेल.

ही इमारत कार्यान्वित होताच सांगोला शहरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका