ताजे अपडेट

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे सोमवारी पंढरपूर दौऱ्यावर

प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख यांची माहिती

Spread the love

सोलापूर : प्रतिनिधी
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे हे सोमवारी पंढरपूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख यांनी दिली.

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांचा हा संघटनात्मक दौरा आहे.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे

रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी दुपारी 11.30 वाजता ते तळेगाव दाभाडेहुन इंदापूरकडे रवाना होतील.

दुपारी 03.00 ते 05.00 वा या वेळेत ते हर्षवर्धन पाटील. यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहणार आहेत. स्थळ : इंदापूर अर्बन बँक, इंदापूर.

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे

संध्याकाळी 7.30 वाजता त्यांचे पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे आगमन व राखीव.

सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता ते पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे दर्शन घेतील.

सकाळी 11.00 ते 12.30 वा या वेळेत सोलापूर जिल्हा भाजपा किसान मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्थळ : मार्केट कमिटी हॉल, पंढरपूर.

ते दुपारी 12.30 वा. मिरजकडे रवाना होतील.

दुपारी 03.30 ते 05.00 वा. या वेळेत सांगली जिल्हा भाजपा किसान मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
स्थळ : ना. सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालय, मिरज.

संध्याकाळी 05.30 वा. ते कोल्हापूरकडे रवाना होतील.

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख

सायं 07.00 ते 08.30 वा. या वेळेत कोल्हापूर जिल्हा भाजपा किसान मोर्चा संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्थळ : भाजपा कार्यालय, कोल्हापूर.

रात्री 8.00 वा. राखीव व मुक्काम असेल.

मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता ते महालक्ष्मी अंबाबाई दर्शन घेतील.

सकाळी 8.30 वाजता ते कराडकडे रवाना होतील.

सकाळी 11.00 ते 12.30 वा. या वेळेत सातारा जिल्हा भाजपा किसान मोर्चा संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
स्थळ : गेस्ट हाऊस, कराड.

दुपारी 12.30 वाजता ते पुण्याकडे रवाना होतील.

दुपारी 4.00 ते 5.30 वाजता पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
स्थळ : पुणे शहर भाजप कार्यालय, पुणे.

संध्याकाळी 6.00 वाजता ते तळेगाव दाभाडे कडे रवाना होतील.

अशी माहिती प्रदेश कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख यांनी दिली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका