आरोग्यगुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशल
Trending

१२ वर्षीय मुलीच्या वागण्यावरुन शंका आली कुटुंब हादरलं

Spread the love

वर्षभरापासून अल्पवयीन मुलीने शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे ती घरीच राहत होती. एक अल्पवयीन मुलगा मुलीला काहीतरी आमिष दाखवत गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार करत होता. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली.

थिंक टँक : नाना हालंगडे 

जळगावमधील यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचारातून मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणाराही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दोन भाऊ, बहिण आणि आईवडिलांसह वास्तव्याला आहे. आई-वडील आणि भाऊ हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात.  वर्षभरापासून अल्पवयीन मुलीने शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे ती घरीच राहत होती. एक अल्पवयीन मुलगा मुलीला काहीतरी आमिष दाखवत गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार करत होता. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली.

प्रतीकात्मक छायाचित्र

दिड महिन्यापूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमात मुलीच्या चालण्या बोलण्यावरून तिच्या आईवडीलांना संशय आला. अधिक चौकशी केली तसंच तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार तिला शुक्रवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी पिडीत अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका