ताजे अपडेटराजकारण
Trending

शेकापला मिळाले बळ, कुटुंबप्रमुखाची महत्त्वाच्या पदावर निवड

Spread the love

डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, महानंद दूध उत्पादक संघावर आपले मार्गदर्शक चंद्रकांत दादा देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. या निवडीचा पक्षातील तसेच कुटुंबातील एक सहकारी म्हणून मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दूध संघ आणखी झेप घेईल, असा विश्वास आहे. दूध उत्पादकांचे प्रश्न, अडीअडचणीवर योग्य तो आवाज उठवून त्यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे.

सांगोला/नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र तथा शेकापचे नेते चंद्रकांतदादा देशमुख यांची महानंद दूध संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

महानंद दूध उत्पादक संघ ही महाराष्ट्रातील नामवंत संस्था आहे. या संस्थेचे हजारो सभासद आहेत. महाराष्ट्रातील नामवंत दूध उत्पादक संस्था म्हणून या संस्थेची ख्याती आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रकांत देशमुख यांची मागच्या वेळेस राखीवमधून निवड झाली होती. यावेळी जनरलमधून निवड झाली आहे.

चंद्रकांत देशमुख यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगोला सूतगिरणी येथे महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.

या निवडीबद्दल पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, महानंद दूध उत्पादक संघावर आपले मार्गदर्शक चंद्रकांत दादा देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. या निवडीचा पक्षातील तसेच कुटुंबातील एक सहकारी म्हणून मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दूध संघ आणखी झेप घेईल, असा विश्वास आहे. दूध उत्पादकांचे प्रश्न, अडीअडचणीवर योग्य तो आवाज उठवून त्यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे. महानंदच्या माध्यमातून दूध उत्पादक तसेच सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या हातून भरीव कार्य घडावे हीच सदिच्छा.

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका