ताजे अपडेट
Trending

संविधान दिवस साजरा न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांची मागणी

Spread the love

सरकारी कार्यालयांमध्ये याची नीटपणे अमलबजावणी होत नाही. हा एका अर्थाने राष्ट्रद्रोह आहे. अशा पूर्वग्रदूषित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बापूसाहेब ठोकळे यांनी केली आहे.

सांगोला/विशेष प्रतिनिधी
संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरीता राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ” संविधान दिवस ” म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने आदेश पारित केले आहेत. मात्र राज्यात अनेक सरकारी कार्यालयांमध्ये, संस्थांमध्ये याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हा संविधानाचा अपमान आहे. असे कृत्य करणाऱ्या सरकारी कार्यालयांमधील अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बोलताना बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, भारताचे एक सार्वभौम , समाजवादी , धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्याय , विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्य घटना अंगिकृत आणि अधिनियमित करुन स्वतःप्रत अर्पण केलेली आहे.

सदर राज्यघटना ही दिनांक २६ जानेवारी , १९५० पासून अंमलात आली. तरीही भारतीय संविधानाची माहिती अजूनही देशाच्या बहुतेक नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील अधिकारी / कर्मचारी यांनाही नाही. या संविधानाने शासकिय , न्यायीक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या त्या संविधानाची ओळख सर्वांना करून देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस ” संविधान दिवस ” साजरा करण्याचे आदेश देण्यात आले.

दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस ” संविधान दिवस ” म्हणून राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये , जिल्हापरिषदा, पंचायतसमित्या, महानगरपालिका, नगरपालिका ग्रामपंचायती , महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये , पुढीलप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हापरिषदा, पंचायतसमित्या, महानगरपालिका, नगरपालिका ग्रामपंचायती, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे (Preamble) (परिशिष्ट -१ पहावे) सामुहिक वाचन करण्यात यावे.

संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयामार्फत त्या दिवशी ” संविधान यात्रा ” काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका, मूलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी संचिधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स , पोस्टर्स वापरावेत . याबाबत शाळा , महाविद्यालयांमध्ये निबंध / भित्तीपत्रके / सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे . शासकिय कार्यालये , स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने , कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत इत्यादी आदेश देण्यात आले आहेत.

असे असताना सरकारी कार्यालयांमध्ये याची नीटपणे अमलबजावणी होत नाही. हा एका अर्थाने राष्ट्रद्रोह आहे. अशा पूर्वग्रदूषित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बापूसाहेब ठोकळे यांनी केली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका