सांगोला तालुक्यात जनावरे वाहतुकीवर बंदी : तहसीलदार
पोलिस पाटलांव्दारे गावोगावी जनजागृती

सांगोला/ नाना हालंगडे
संपूर्ण देशभर जनावरांमध्ये लंपी स्किन अर्थात चर्मरोगाचा प्रसार जोमाने सुरू असून,आपल्या सोलापूर जिल्ह्यातही अडीच हजाराच्या आसपास जनावराना लागण झालेली आहे,असे समजते. त्यामुळे खरबदारी म्हणून आपल्या सांगोला तालुक्यातील पशुपालकांनी विशेष अशी दक्षता घेतली पाहिजे .त्यामुळे संपूर्ण तालुकाभर जनावरांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.यामध्ये गावोगावच्या पोलिस पाटलाना यामध्ये सामावून घेणार असल्याचे, तहसिदार अभिजित पाटील यांनी सांगितले.

लम्पीने जनावर दगावल्यास सरकार देणार मदत
जनावरामधील लपि स्किनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील 24 सरकारी दवाखान्याचे डॉक्टर आणि खाजगी पशूवैदक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदाभाऊ खोतांशी नडणाऱ्या हॉटेलवाल्याला वाळू चोरीत अटक
यावेळी उपस्थित सर्वच पशूवैदकांना मार्गदर्शन करताना, तहसिदार पाटील म्हणाले की, ही फक्त आपत्ती आहे. कोणीही संधीचा फायदा घेवू नये. तालुका भरातील सर्वच पशुवैद्यकानी अल्पदरात लसीकरण करावे. कोणीही संधी साधून,याचा फायदा घेवू नये. आपला तालुका हा संपूर्णपणे पशूधनावरच अवलंबून आहे. पशूसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत, हा रोग थोपवयाचा आहे. आपला जनावरांचा बाजार ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे पोलिस आणि आर टीओ यांचीही मदत घेवून,जनावरे वाहतुकीस संपूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.
यावेळी प्रारंभी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.सय्यद यांनी लंपिस्किन हा रोग कसा आहे.यावरती उपाययोजना काय आहेत. तर यावरती शेळ्यामधील goat pox ही लस उपयुक्त ठरित आहे. सर्वांनीच खबरदारी घेत,एखाद्या गावात जर असा पशू सापडला तर,तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्ग साधावा.
आपल्या सांगोला तालुक्यात 1 लाख 47 हजार 802 इतकी जनावरे आहेत. सुदैवाने आपल्या तालुक्यात बाधित जनावरे नाहीत. इथून पुढच्या काळातही सर्वांनीच सतर्क राहावे,असे डॉ सय्यद यांनी सांगितले.यावेळी मोठ्या प्रमाणात पशुवैदक उपस्थित होते.
पाहा खास व्हिडिओ



