सांगोला तालुक्यात आता पोलिसांच्या उपस्थितीत लसीकरण

डिकसळ, मेथवडेसह अन्य आठ गावांचा समावेश

Spread the love

सांगोला तालुक्याची 18 वर्षांवरील कोरोना लसीकरणाची संख्या 2 लाख 58 हजार 744 इतकी असून पहिला डोस 1 लाख 17 हजार 715 लोकांनी घेतला आहे. याचे हे काम 66 टक्के झाले आहे. तर दुसरा डोस 59 हजार 225 लोकांनी घेतला असून याचे हे काम अवघे 24 टक्केच झाले आहे. त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे.

(सांगोला/ नाना हालंगडे) सांगोला तालुक्यातील 102 गावांपैकी 10 गावांमध्ये कोरोना लसीकरण कमी प्रमाणात झाल्याने सीईओ दिलीप स्वामी यांनी नोटीस दिली होती. पण आता चक्क जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या गावासाठी पालक अधिकारी नेमून लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सांगोला तालुक्याची 18 वर्षांवरील कोरोना लसीकरणाची संख्या 2 लाख 58 हजार 744 इतकी असून पहिला डोस 1 लाख 17 हजार 715 लोकांनी घेतला आहे. याचे हे काम 66 टक्के झाले आहे. तर दुसरा डोस 59 हजार 225 लोकांनी घेतला असून याचे हे काम अवघे 24 टक्केच झाले आहे. त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे.

सोलापूरच्या सीईओने सरपंचांना नोटीस धाडली. तरीपण काहीच परिणाम न झाल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पालक अधिकारी नेमले आहेत. यामध्ये गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, बांधकामाचे कार्यकारी अभियंता,पशूसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश असणार आहे.


सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 144 गावापैकी 100 गावांमध्ये हे लसीकरण कमी आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील डिकसळ, धायटी, मेथवडे, हटकर मंगेवाडी, बामणी, तरंगेवाडी, चिंचोली, बुरंगेवाडी, देवकतेवाडी व बंडगरवाडी या दहा गावांचा समावेश आहे. 15 डिसेंबर पासूनच या गावामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या उपस्थित लसीकरण होणार आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आता लसीकरणासाठी, पालक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. यामध्ये गटविकास अधिकारी,पोलिस निरीक्षक, पशूसंवर्धन अधिकारी, बांधकामाचे कार्यकारी अभियंता, कृषी अधिकारी.

अशी आहेत गावे
सांगोला तालुक्यातील 102 गावांपैकी या 10 गावांमध्ये कोरोना लसीकरण कमी झाले आहे. यामध्ये डिकसळ, धायटी, बामणी, मेथवडे, हटकर मंगेवाडी, चिंचोली, बंडगरवाडी, बुरंगेवाडी व देवकतेवाडी या गावांचा समावेश आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका