सांगोला तालुक्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ५४८ विद्यार्थ्यांची उपस्थिती

पहिली ते चौथीच्या शाळा सुरू; १० हजार ३७२ विद्यार्थ्यांची दांडी

Spread the love

सांगोला / नाना हालंगडे

तब्बल 20 महिन्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यात आले असून आज 1 डिसेंबर रोजी पहिल्याच दिवशी 11 हजार 548 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यामुळे तालुक्यात आनंददायी शिक्षणाला सुरुवात झाली असून,मुलांमध्ये विशेष असा उत्साह पहावयास मिळाला.

कोरोना महामारीमुळे मागील 20 महिन्यापासून शाळा बंदच होत्या. 5 ते 12 पर्यंतचे वर्ग काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते ,पण 1 ते 4 चे वर्ग सुरू केले नव्हते. कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य शासनाने मागील काही दिवसापूर्वी आदेश काढले होते.

त्याअनुषंगाने 1 डिसेंबरपासून सांगोला तालुक्यात शाळा सुरू झाल्या. तालुक्यात 389 जिल्हा परिषदेच्या शाळा असून 1 ते 4 चे 21 हजार 920 इतके विद्यार्थी असून काल 11 हजार 548 इतके विद्यार्थी पहिल्याच दिवशी हजर होते.

तब्बल 20 महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष असा उत्साह दिसत होता. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

सांगोला तालुक्यात 1 ते 4 च्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. 389 शाळा सुरू झालेल्या आहेत. पहिल्याच दिवशी 11 हजार 548 विद्यार्थी उपस्थित होते. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब फुल देवून स्वागत करण्यात आले. सर्वांनी कोरोना नियम पाळावेत. -प्रदीपकुमार करडे (गटशिक्षण अधिकारी, पं.स.सांगोला)

पहिल्याच दिवशी तालुक्यातील सर्वच गावामध्ये माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका