सोलापूर जिल्ह्यात थरार, पतीने केला पत्‍नी आणि मुलीचा निर्घृण खून

Spread the love

करमाळा : थिंक टँक न्यूज नेटवर्क
अज्ञात कारणाने पतीने पत्नी व मुलीच्या डोक्यात घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना भिलारवाडी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे घडली आहे. खून केल्यानंतर क्रूरकर्मा पती पळून गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लक्ष्मी अण्णा माने (वय 30) व श्रुती अण्णा माने (वय 12) अशी खून झालेल्या आई व मुलीची नावे आहेत. अण्णा भास्कर माने (रा. भिलारवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

संशयित आरोपी आण्णा माने, मयत लक्ष्मी माने व श्रृती माने, मुलगा रोहित माने व मृताची सासू हे एकत्रित भिलारवाडी येथे राहत होते. दोन्ही मृत व संशयित आरोपी आण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजी सोबत दुस-या खोलीत झोपले होते. दरम्यान, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आण्णा माने हा मोटारसायकलवरून निघून गेल्याचे मुलगा रोहित माने याने पाहिले होते. त्यानंतर सकाळी लक्ष्मी व श्रृती या दोघी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार उघडकीस आला.

आण्णा माने यानेच अज्ञात हत्याराने अज्ञात कारणाने दोघींच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्‍याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार मृत लक्ष्मीचा भाऊ कमलेश चोपडे यांनी संशयित आरोपी आण्णा मानेच्या विरोधात दोन खून केल्याची फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका