उमदी येथे भाविकांना चारचाकीने चिरडले; तिघेजण जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने दुर्दैवी घटना

Spread the love

सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे महालिंगराया यात्रेसाठी चालत जाणाऱ्या भाविकांना एका चार चाकी गाडीने चिरडल्याने तिघेजण जागीच ठार झाले आहेत. मयत तिघेही कर्नाटकातील आहेत. बसवराज उर्फ बसाप्पा दुर्गाप्पा चिंचवडे (वय.३२, रा.यदभावी ता.लिंगसुर), नागप्‍पा सोमांना अचनाळ (वय ३४ ), म्हानाप्पा दुर्गप्पा गोंदीकल (वय ४०, दोघे रा.देवभुसर ता. लिंगसुर जि.रायचुर) अशी ठार झालेल्या भक्तांची नावे आहेत. ही घटना उमदी-मंगळवेढा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली आहे.

यात्रेसाठी जाणाऱ्या निष्पाप काळाने घाला घातल्याने भाविकात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सद्यस्थितीत हुलजंती येथे महालिंगराया व बिरोबा गुरु-शिष्य भेटीचा पालखी सोहळा आठवडाभर सुरू असतो. या पालखी सोहळ्यासाठी कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवासह इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने भक्त जात असतात.

शनिवारी हुलजंतीकडे चालत जाणाऱ्या भक्तांची संख्या दिवसभर सुरू आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकमधून उमदी यामार्गे हुलजंतीला भक्त जात होते. दरम्यान पुण्याहून कर्नाटकातील विजयपूरकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीचे टायर जागीच फुटल्याने या घटनेत तिघा भाविकांना जीव गमवावा लागला आहे.

 

टायर फुटलेने या चार गाडीने रस्त्याने चालत जाणाऱ्या भक्त समूहातील बसवराज उर्फ बसाप्पा दुर्गाप्पा चिंचवडे, नागप्‍पा सोमांना अचनाळ म्हानाप्पा दुर्गप्पा गोंदीकल या भक्तांच्या अंगावर चारचाकी गाडी आदळली यात जागीच तिघांचा मृत्यू झाला आहे. व एक जण गंभीर जखमी झाला आहे . या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका