कै. गणपतराव देशमुख यांच्या आठवणीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात झाले भावूक

सांगोला येथील निवासस्थानी भेट देऊन केले कुटुंबियांचे सांत्वन

Spread the love

सांगोला : डॉ. नाना हालंगडे
कै. आबासाहेबांसोबत 35 वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. सभागृहामध्ये ते अभ्यासपूर्ण भाषण करत असत. ते बोलायला उभे राहिले की सर्व सभागृह शांत बसायचे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, असे सांगताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात भावूक झाले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सांगोला येथील कैm गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सोबत आमदार अमिन पटेल, आमदार रामहरी रुपनवर, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष राजन भोसले यांच्यासह आबासाहेबांच्या पत्नी रतनमाई, त्यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख, नातू डाॅ. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभेमध्ये आबासाहेबांच्या सोबत 35 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. सभागृहामध्ये ते अभ्यासपूर्ण भाषण करत असत. ते बोलायला उभे राहिले की सर्व सभागृह शांत बसायचे. डोळ्याने दिसत नसल्यामुळे सभागृहाचा लॉबीमध्ये बसून ते अधिवेशनाचे कामकाज पी. ए. कडून वाचून घेत असत. अधिवेशनाच्या संपूर्ण काळामध्ये सभागृहांमध्ये पूर्णवेळ बसून राहायचे. प्रत्येकांना त्यांच्याविषयी आपुलकी होती.

भाई गणपतराव देशमुख हे आजारी असताना ना. थोरात यांनी वेळोवेळी फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका