सांगोला तालुक्यातील पशुपालकांनी लाळखुरकतची लस टोचून घ्यावी

जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांचे आवाहन

Spread the love
  • तालुक्यासाठी दीड लाख डोस

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात असून,राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये लाळखुरकत सदृश्य रोगांची लागण सुरू आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील पशुधनासाठी दीड लाख लसमात्रा आलेली आहे. पशुपालकांनी आपल्या जनावराना लसीची टोचणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.

सांगोला तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी जिल्हा परिषदेत आवाज उठवून मी ही लस तात्काळ उपलब्ध केली आहे. तालुक्यातील अनेकांचा उदरनिर्वाह यावरच सुरू आहे. सध्या जनावांरामध्ये लाळीची साथ सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पशुपालकांनी आपली जनावरे तात्काळ टोचून घ्यावीत. ही मोहीम आजपासूनच सुरू होत आहे.

तालुक्यात दीड लाखाच्या आसपास पशुधन आहे. यामध्ये संगोल्यासाठी साडे सात हजार लस, महुदसाठी 15 हजार 170 डोस, नाझरा केंद्रासाठी 2 हजार 800 लस, कोळाकेंद्रासाठी 7 हजार 957 डोस, जूनोनी केंद्रासाठी 5 हजार 336 डोस, सोनंद केंद्रासाठी 5 हजार 339 डोस,जवळा केंद्रासाठी 5 हजार 650 डोस, मेडशिंगी केंद्रासाठी 4 हजार 882 डोस, मांजरी केंद्रासाठी 5 हजार 281 डोस,पारे 7 हजार 338 डोस, कडलास केंद्रासाठी 4 हजार 900 डोस, नरलेवडी केंद्रासाठी 4 हजार 900 डोस,घेरडी केंद्रासाठी 6 हजार 500 डोस,अकोला केंद्रासाठी 4.हजार 100.डोस, शिरभावी केंद्रासाठी 8 हजार 750 डोस यासह अन्य नऊ केंद्रामध्ये ही लस उपलब्ध झाली आहे.

सर्व पशुपालकांनी आपले पशुधन लसीकरण करून घ्यावे,. ही लाळची साथ लगतच्या तालुक्यामध्ये सुरू आहे,त्यामुळे कोणीही खबरदारीचा उपाय म्हणून ही लस टोचून घ्यावी, तालुक्यात जनावरांची संख्याही मोठी आहे. दूध व्यवसायावर अनेक कुटुंबीयांची मदार अवलंबून आहे,सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात हे लसीकरण तात्काळ करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य ॲड्,सचिन देशमुख यांनी केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका