गुन्हेगारी

सांगोल्यात 6 लाखाचा गुटखा पकडला

Spread the love

सांगोला शहरात अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आलेला गुटखा छुप्या पद्धतीने विक्री केला जात असल्याची माहिती मिळत आहे. बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीबाबत पोलीस अधून मधून कारवाई करत असेल तरी त्याचा कोणताही परिणाम गुटखा विक्रेत्यांवर होताना दिसत नाही. बाजारभावापेक्षा अधिक रक्कम घेऊन गुटखा विक्री केली जाते. याला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सातत्य ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सांगोला / नाना हालंगडे
अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करीत असताना सांगोला पोलिसांनी एका पिकअपसह त्याच्या चालकास ताब्यात घेतले असून प्रतिबंधित असलेला 5 लाख 92 हजार 800 रुपयांच्या अवैद्य गुटखा व 5 लाख रुपये बोलेरो कंपनीचा पिकअप असा एकूण 10 लाख 92 हजार 800 रुपयेचा मुद्द्येमाल ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी ही कारवाई 11 एप्रिल रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास वाटंबरे (ता. सांगोला) हद्दीमधील नॅशनल हायवेवरील सांगोला ते सांगली जाणाऱ्या रस्त्यावर केली आहे.

अन्नसुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सांगोला तालुक्याच्या हद्दीमध्ये पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित पिकअप (क्रमांक – एम. एच – 09, एफ. एल – 11 35) हे 11 एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास वाटंबरे (ता. सांगोला) हद्दीमध्ये वाटंबरे गावच्या फुलाजवळ सांगलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबविला.

वाहन चालकास वाहनात काय आहे यावर विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रतिबंधित असलेला 5 लाख 92 हजार 800 रुपयेंचा गुटखा व 5 लाख रुपये किमतीच्या बोलोरे पिकअप असा एकूण 10 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत वाहन चालक दिलीप प्रकाश नरळे (रा. समता नगर, मिरज, जि. सांगली) असे वाहन चालकाचे नाव असल्याचे सांगितले. हा गुटखा कोणाकडे पुरवठा करायचा होता, याचे मालक कोण आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सांगोल्यात गुटखा मोकार
सांगोला शहरात अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आलेला गुटखा छुप्या पद्धतीने विक्री केला जात असल्याची माहिती मिळत आहे. बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीबाबत पोलीस अधून मधून कारवाई करत असेल तरी त्याचा कोणताही परिणाम गुटखा विक्रेत्यांवर होताना दिसत नाही. बाजारभावापेक्षा अधिक रक्कम घेऊन गुटखा विक्री केली जाते. याला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सातत्य ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा

पाटलाची औलाद हाय.. 175 खोकी इस्कटल्याती

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका