ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी
Trending

शेकापची प्रतिष्ठा पणाला, सांगोला खरेदी-विक्री संघासाठी 11 फेब्रुवारी रोजी मतदान

17 जागांसाठी 56 अर्ज, कोण बाजी मारणार?

Spread the love

सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्थापनेपासून शेकापचे वर्चस्व आहे. यामध्ये काही जागा राष्ट्रवादीलाही दिल्या होत्या. पण आता तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचे आहेत. आता लागलेली निवडणूक शेकापसाठी प्रतिष्ठेची आहे. हा संघ राज्यातच अव्वल आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.

सांगोला/ नाना हालंगडे
स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या, सातत्याने बिनविरोध परंपरा असलेल्या सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाची अखेर निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पंचवार्षिक निवडणूकीच्या १७ जागेसाठी दाखल झालेल्या ६० अर्जापैकी ५६ अर्ज वैद्य ठरले तर ४ अर्ज अवैध (नामंजूर) झाले आहेत. दरम्यान नामंजूर चार अर्जावर येत्या सोमवार, १५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. येत्या मंगळवार, १६ ते सोमवार ३० जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून सोमवार, ११ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. आतापर्यंत या संघाची परंपरा आहे. कायम बिनविरोध निवड पार पडलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा संघ फायदेशीर आहे.

शेतकरी सूतगिरणीच्या निवडणुकीनंतर आता सांगोला तालुका खरेदी विक्री संघाच्या १७ जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. खरेदी-विक्री संघाचे व्यक्तिगत २१६४ सभासद असून ८३ संस्था सभासद असे एकूण २२४७ सभासद आहेत.

दरम्यान १७ जागेसाठी सोमवार, ९ ते १२ जानेवारी या कालावधीत १७ जागेसाठी सर्वसाधारण- १२ जागेसाठी- ३८ अर्ज, महिला प्रतिनिधी – २ जागेसाठी- ६अर्ज, इतर मागासवर्ग- १ जागेसाठी -६ अर्ज , भटक्या विशेष मागास प्रवर्ग-१ जागेसाठी -६ अर्ज, अनुसूचित जाती जमाती- १ जागेसाठी – ४ अर्ज असे एकूण ६० अर्ज दाखल झाले होते.

दरम्यान सांगोला येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सहाय्यक निबंध प्रकाश नालवार यांच्यासमोर शुक्रवार, १३ जानेवारी रोजी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत अर्जाची छाननी झाली. यावेळी दाखल ६० अर्जापैकी श्रीरंग गंगाराम माळी यांचे मूळ जात प्रमाणपत्र नसल्यामुळे, किसन खंडू माळी सलगरे सलगरे आडनावाचे पुरावे सादर न केल्यामुळे, तर निवृत्ती आप्पा फुले यांच्या अर्जावर न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे हरकती घेण्यात आल्यामुळे असे ४ अर्ज नाममंजूर झाले आहेत.

येत्या १६ ते ३० जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. १६ जानेवारी रोजी वैद्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल तर ३१ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. तर शनिवार ११ फेब्रुवारी०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्थापनेपासून शेकापचे वर्चस्व आहे. यामध्ये काही जागा राष्ट्रवादीलाही दिल्या होत्या. पण आता तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचे आहेत. आता लागलेली निवडणूक शेकापसाठी प्रतिष्ठेची आहे. हा संघ राज्यातच अव्वल आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.


हेही वाचा

सांगोला हादरला, तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून

‘न खाई भोगी तो सदा रोगी’

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका