भिवंडीच्या मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाचा उद्रेक, 69 वृद्धांना कोरोनाची लागण

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच नाना
भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघाजवळील खडवली येथे नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत.

एकीकडे जिल्ह्यात विशेषतः भिवंडी शहर ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आला असल्याचे दिसत आहे, भिवंडी शहरातही शनिवारी (27 नोव्हेंबर) दिवसभरात केवळ 1 रुग्ण आढळून आला. तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये 5 रुग्ण आढळून आले.

शेतीपंपाची आजपासून वीज तोडणी मोहिम

त्यातच मागील आठवड्यात या आश्रमातील काही जणांना ताप आल्याने उपचार सुरू केले.यात एका व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली.

ज्यानंतर 69 वृद्धांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. आता या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका