गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशल
Trending

बार्शी हादरले! शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट; पाच मृत्यू, २५ जण गंभीर

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले.

बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. मोठया प्रमाणात आग लागल्याने मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी ४ पर्यंत ४ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ पाहा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका