‘वंचित’ला आणखी एक धक्का, प्रदेश महासचिवाचा भाजपात प्रवेश

प्रदेश महासचिव, लिंगायत नेते शिवानंद हैबतपुरे भाजपवासी

Spread the love

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव, महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष, लिंगायत समाजाचे महाराष्ट्रातील धडाडीचे नेते शिवानंद हैबतपुरे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.


शिवानंद हैबतपुरे हे लिंगायत समाजाचे महाराष्ट्रातील धडाडीचे नेते आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत राज्यभर मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन वातावरण तापवले होते. ते बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा.शिवानंद हैबतपूरे यांचा भाजपा प्रवेश लातूर येथे झाला.


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ.रमेश आप्पा कराड, मा.खा.सुधाकर श्रंगारे, मा.आ.संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके,  प्रदेश उपाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आमदार विनायकराव पाटील, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, प्रदेश सचिव अरविंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूर शहर अध्यक्ष गुरुनाथ मग्गे, प्रेरणाताई होनराव,  जि.प.उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, जि. प. सदस्य रोहिदास वाघमारे न.प.सदस्य सचिन हुडे, चाकूर पं. स. उपसभापती सज्जनकुमार लोनाळे बालाजी पाटील चाकूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका