ताजे अपडेट
Trending

शशिकांत देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन

Spread the love

शशिकांत देशमुख यांनी सांगोला तालुक्यात कुस्ती क्षेत्रात मोठे काम केले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि शशिकांत देशमुख या बंधूंनी जवळा गावात तब्बल वीस वर्षे कुस्ती स्पर्धा स्वखर्चाने आयोजित केल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती मैदाने आयोजित केली आहेत. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी तसेच देश विदेशातील नामवंत मल्ल यांना जवळा गावात आणून कुस्ती कला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. शशिकांत देशमुख यांनी पोलिस दलातील भरीव कामगिरी केली आहे. आजही ते राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्रात मोठ्या ताकदीने काम करीत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. कुस्ती क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पोलीस अधिकारी पैलवान शशिकांत देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे.

पोलिस दलात कर्तव्य बजावून कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या तसेच यशस्वी रित्या सेवा पार पाडून सेवानिवृत्त झालेल्या माजी खेळाडू यांचा सेवानिवृत्ती समारंभ मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात येत आहे

१५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता पोलिस संकुल कुस्ती हॉल, नायगांव, दादर, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात शशिकांत देशमुख यांच्यासह पै. बाजीराव कळंत्रे (सेवा निवृत्त स.पो. आयुक्त), पै. मधुकर शिंगटे, पै. कुबेर पाटील पै. रमेश गिरी, पै. प्रकाश गिरी, पै. प्रताप लोखंडे, पै. दादासाहेब शेळके (सेवा निवृत्त स.पो. आयुक्त.), पै. दिनकर पाटील, पै.संपत कासुरडे, पै. संदीप निघोट, पै. दशरथ तळेकर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई पोलिस दलातील सर्व आजी माजी कुस्ती खेळाडू यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका