गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

आ. प्रज्ञा सातवांवर जीवघेणा हल्ला

मागून केला हल्ला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Spread the love

प्रज्ञा सातव या आज हिंगोली दौऱ्यावर होत्या. कसबे दौंड या गावांमध्ये त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी असून त्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत.

थिंक टँक / नाना हालंगडे
काँग्रेसचे दिवंगत खासदार तथा राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे स्व. राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झाला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. एका विद्यमान आमदारांवर असा भ्याड हॉल होत असेल पोलीस प्रशासन काय करत होते? असा सवाल विचारण्यात येत आहे.

माझ्या जीवाला धोका आहे, असं ट्विट प्रज्ञा सातव यांनी केलंय. एका अज्ञात व्यक्तीने आपल्यावर हल्ला केल्याचं प्रज्ञा सातव म्हणाल्या आहेत. महिला आमदारावर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असंदेखील प्रज्ञा सातव म्हणाल्या. तसेच कळमनुरी तालुक्यातील एका गावात हा हल्ला झाल्याचं प्रज्ञा सातव यांनी सांगितलं आहे.

त्यांच्या मतदारसंघातील कसबे दवंडा या गावात असताना हा हल्ला झालेला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

प्रज्ञा सातव या आज हिंगोली दौऱ्यावर होत्या. कसबे दौंड या गावांमध्ये त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी असून त्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत.

असा झाला हल्ला
“मी कळमनुरी तालुक्यात काही गावांच्या दौऱ्यावर होती. या दरम्यान कसगे धावंडा या गावी गाडीतून उतरत होती तेव्हा एक इसम माझ्या गाडीच्या दरवाज्याजवळ आला. त्यामुळे मी पटकन गाडीत बसली आणि दार लावून घेतलं. नंतर माझ्या बॉडिगार्डने त्याला बाजूला केलं”, असं प्रज्ञा सातव यांनी सांगितलं.

“बॉडीगार्डने त्या इसमाला बाजूला केल्यानंतर मी उतरुन नियोजित कार्यक्रमाला गेली. तिथे मी इतरांशी बोलू लागली. तेव्हा हा इसम मागून आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी पटकन सावरली आणि सगळ्यांनी त्याला पकडलं. लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली”, अशी माहिती प्रज्ञा सातव यांनी दिली.

“संबंधित इसम माझ्या ओळखीचाही नव्हता. बहुतेक तोही मला ओळखत नसावा. पण तेवढ्या गर्दीत तो बरोबर माझा शोध घेऊन तिथे आला. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असू शकतो किंवा कुणीतरी आधीच थांबून ठेवलेलं असेल. कारण मी जाणार असल्याची माहिती कालच त्या गावात दिली गेली होती”, असं त्यांनी सांगितलं.

“सुरक्षेत चूक झालेली नाही. माझी बॉडीगार्ड होती. ती माझ्या बाजूला उभी होती. पण समोर बघत होती. पण इसमाने मागून येऊन हल्ला केला. आजपर्यंत कधी असं वाटलं नाही. मी रोजच फिरत असते. त्यामुळे असं कधी होईल वाटलं नव्हतं”, असं प्रज्ञा सातव यांनी सांगितले आहे.

“पुन्हा कुणाची अशी हिंमत होऊ नये म्हणून मी शांत न बसता पोलिसांकडे तक्रार केलीय. कारण आपण शांत बसलो तर समोरच्याची हिंमत अजून वाढेल”, असं प्रज्ञा म्हणाल्या.

प्रज्ञा सातव यांची फेसबुक पोस्ट

आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.

एक अज्ञात व्यक्तीने मागून माझ्यावर हल्ला केला. हा जोरदार हल्ला होता आणि माझ्या जीवाला धोका आहे. एका महिला आमदारावरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. समोरून लढा, मागून भित्र्यासारखा हल्ला करु नका.

आ. सातव यांनी ट्विटर पोस्ट

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका